मनाली
मनाली : हिमाचल प्रदेशाच्या कुलू जिल्ह्यातील निसर्गसुंदर शहर.लोकसंख्या २,२५४ (१९८१). हे सिमल्याच्या उत्तरेस सु. २५० किमी. सस. पासून १,७९८ मी. उंचीवर वसलेले आहे. बर्फाच्छादित पर्वतशिखरे, उत्तुंग देवदार वृक्ष, जवळून वाहणारा व्यास नदीचा प्रवाह, थंड व आल्हाददाय हवामान यांमुळे मनाली हे पर्यटकांचे एक आकर्षण ठरले आहे.